Top News

नारायण घोडके अनंतात विलीन !

 



फुलंब्री प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील रहिवासी असलेले नारायण विठ्ठल घोडके २७ एप्रिल रोजी अनंतात विलीन झाले.या पंचक्रोशीतील अतिशय प्रख्यात असं व्यक्तिमत्व असलेल्यापैकी एक होते. अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून यांनी मोठी झोप घेतली होती.यांना काही महिन्यापासून एका आजाराने ग्रस्त झाले असून त्यावर उपचार चालू होते. यांना काही प्रमाणात त्रास होत असल्यामुळे सेठ नंदलाल धुत रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले होते.याठिकाणी उपचारादरम्यान 27 एप्रिलला सकाळी ०५ : ४५ वाजून मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली. 

  हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिकवून एका मुलाला आधुनिक पद्धतीने शेती करणे त्यासोबत आपला व्यवसाय सांभाळणे तसेच दुसऱ्या मुलाला वकिलीचे शिक्षण देऊन वकील बनवले मुलीला चांगल्या प्रकारे शिकवून आपल्या पायावर उभे केले. त्यांच्या नावाप्रमाणे कोणालाही नाही म्हणणे यांना माहित नाही आपल्या परिस्थितीनुसार आपल्या नातेसंबंधातील किंवा परिसरातील नागरिकांची जेवढ्या प्रमाणात काम करता येईल ती करून मदत करणे हा यांचा उद्देश पूर्ण करण्याचे काम करीत होते. 

  त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला यांनी आपली प्रत्येक क्षेत्रात एक छाप सोडली आहेत त्यांच्या पश्चात भाऊ बहीण पत्नी निर्मला नारायण घोडके मुलगा हरिदास नारायण घोडके ॲड. संदीप नारायण घोडके मुलगी शितल नारायण घोडके पतीकडचे नाव शितल अविनाश शिंदे असा त्यांचा परिवार आहेत त्यांच्यावर वानेगाव मध्ये अतिशय शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

शोकाकुल : सा. सप्तरंग वृत्तपत्राकडून त्यांना 

       भावपूर्ण श्रद्धांजली !

दिगंबर वाघ

कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने