Top News

संभाजीनगर PWD येथील मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहेत ?

भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे ते पती आहेत यांची आमदारकी फक्त पतीच्या बदल्या व पदोन्नतीसाठीच वापर होत होता.?

संभाजीनगर प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागात वादग्रस्त राहिलेले हेच ते अतुल चव्हाण असून यांनी सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून आपल्या पत्नीचा प्रचार केला. त्यानंतर काही दिवसापूर्वी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजप या राजकीय पक्षाच्या बॅनरवर यांनी स्वतःचा फोटो छापला त्यानंतर फुलंब्री दिनदर्शिका -२०२५ या कॅलेंडरवर सुद्धा यांचा फोटो होता अशा अनेक वादात अडकलेले चव्हाण आज अचानक तडकाफडकी राजीनामा का देतात यामागे मोठे रहस्य आहेत.भाजप आमदार PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला.

   मिळालेल्या माहितीनुसार अतुल चव्हाण हे पत्नीची आमदारकी मतदारसंघात स्वतः चालवत होते यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना एखाद्या कामासाठी शिफारस पत्र हवे असल्यास ते देताना जात आणि धर्म बघून देत होते यात आणखी माहिती अशी की येतील एका ओबीसी नागरिकाने शिफारस पत्र मागितले असता त्यांनी ओबीसी असल्यामुळे शिफारस पत्र दिले नाही म्हणजेच हे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद मतदारसंघात करीत होते. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक यांच्या यात्रासाला कंटाळलेले होते या कारणावरून राजीनामा दिला का किंवा असे अनेक कारण यांच्याकडे आहेत त्यामुळे आपल्या मुख्य अभियंता पदाचा राजीनामा दिला म्हणजे सर्व काही होत नाही अधिक माहिती अशी की या संदर्भात उच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित असल्यामुळे त्यांना त्याचा हिशोब द्यावच लागेल अशा प्रकारची मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

बदलीला घाबरून राजीनामा दिला असावा...

  अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे असल्याने काहींनी शासनाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींनंतर शासनाने २२ जून रोजी चव्हाण यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना ३१ जुलै रोजी तेथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असल्याने त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पदोन्नतीची फाईल शासनदरबारी सादरही झाली होती मात्र ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याच्या नाराजीतून चव्हाण यांनी ३२ वर्षांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार ते मार्च २०३० मध्ये सेवानिवृत्त होणार होते मात्र चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने